देवठाण प्रतिनिधी

चालू शैक्षणिक वर्षातील देवठाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांचा आणि अंगणवाडी सेविकांचा एकत्रित शाळा पूर्व तयारी मेळावा संपन्न झाला या कार्यक्रमातून मराठी शाळेची पटसंख्या वाढविणे व इयत्ता -1 ली च्या वर्गात दाखल होणाऱ्या मुलांचा भाषिक व गणिती गणन क्रिया यांचा विकास होऊन निपुन विद्यार्थी शाळेत दाखल करणे होय यासाठी शाळेत दाखल होणाऱ्या मुलांच्या सात क्षमतांची सात टेबल मांडणी करून चाचपणी करण्यात आली त्यात गणिती क्षमता , भाषा क्षमता , शारीरिक विकास , बौद्धिक क्षमता इत्यादी क्षमतांची पडताळणी करण्यात आली या मेळाव्यात 39 शिक्षक व 16 अंगणवाडी सेविकांचा सहभाग होता यातून पुढील वर्षी शाळेचा पट वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे मार्गदर्शक भाऊसाहेब पुरी व श्रीमती पोर्णिमा दारोळे यांनी केले या मेळाव्याचे नियोजन संजय गायकवाड यांनी केले . शाळेचे शिक्षण विस्ताराधिकारी अनिल गायकवाड अंगणवाडी पर्यवेक्षिका सोनाली भनगडे केंद्रप्रमुख स्वाती अडाने यांनी मार्गदर्शन केले

संपादक शिवाजी पाटोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *