वनविभागाच्या वतीने देवठाण ते वृक्षारोपांची वाटप

oplus_2

देवठाण प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील देवठाण येथे वनविभागाच्या वतीने वन महोत्सव निमित्त प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर रोपांचे वाटप करण्यात आले
झेंडावंदनाचा कार्यक्रम संपल्यानंतर देवठाण बस स्थानका समोर वन खात्याने रोपांचा ट्रॅक्टर उभा करून मागेल त्याला झाड देण्याचे आयोजन केले होते
यावेळी देवठाण गावचे सरपंच निवृत्ती जोरवर यांच्या हस्ते झाडाचे वितरण सुरू करण्यात आले
वनपाल पंकज देवरे, वनरक्षक एकनाथ पारेकर, वनमजूर बाळासाहेब मंडलिक, वन खात्याच्या वतीने उपस्थित होते
याशिवाय माजी सरपंच एकनाथ सहाने,अगस्ती कारखाना संचालक सुधीर शेळके, अमृतसागर दूध संघाचे माजी संचालक शिवाजी पाटोळे, देवठाण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन जालिंदर बोडके,संचालक राम सहाने, माजी चेअरमन विष्णू शेळके, पोलीस पाटील राधाकिसन जोरवर, रमेश पथवे, शांताराम जोर्वेकर प्रकाश बोडके, सुनील घाडगे, नवनाथ काळे, अशोक सोनवणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते

संपादक शिवाजी पाटोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *