
देवठाण प्रतिनिधी
देवठाण येथे नुकताच माकप च्या कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला या श्रमिक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माकपचे राज्याचे नेते कॉम्रेड अजित नवले हे होते याप्रसंगी अनेक कामगार शेतकरी व बांधकाम मजूर उपस्थित होते या मेळाव्यात बोलताना डॉक्टर अजित नवले यांनी सांगितले की या अकोले तालुक्यातील चार दोन रस्ते व सभा मंडप झाले म्हणजे तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला असे म्हणता येणार नाही गोरगरीब श्रमिक जनतेसाठी प्रशासनावर वाचक घेऊन वेळेत काम करून घेणे हे सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांचे व जनतेच्या मतावर निवडून जाणाऱ्या विविध स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधींचे काम असते ते जर कामात कमी पडत असेल तर आपला आपला जनरेटा चालू ठेवणे अत्यंत गरजेचे आहे तेव्हा जनतेच्या प्रश्नासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष लढा उभारण्यासाठी सदैव तयार आहे असे डॉक्टर अजित नवले म्हणाले
गोरगरीब श्रमिक जनतेच्या विविध प्रश्नांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तालुका कार्यकारिणीच्या वतीने लवकरच श्रमिकांसाठी तहसील कार्यालयात घुसून आंदोलन करणार असून दिवाळीचा सण शासनाला व शासनाच्या अधिकाऱ्यांना सुखाने खाऊ देणार नाही असा इशारा माकप नेते कॉम्रेड तुळशीराम कातोरे यांनी दिला आहे
यावेळी एडवोकेट किशोर काकड यांनी गावातील स्थानिक प्रशासनावर कडाडून टीका केली वेळप्रसंगी प्रशासकीय यंत्रणेच्या विरोधात आंदोलन करावे लागणार आहे त्यासाठी जनतेने सज्ज व्हावे असे आवाहनही एडवोकेट काकडे यांनी केले
याप्रसंगी डॉक्टर अजित नवले कॉम्रेड तुळशीराम कातोरे एडवोकेट ज्ञानेश्वर काकड समशेरपुर,चे सरपंच एकनाथ मेंगाळ देवठाण चे माजी सरपंच एकनाथ सहाने देवठाण सोसायटीचे संचालक राम सहाणे अनिल सोनवणे सुनील सहाने सुमन इरनक संगीता साळवे अजय शेळके बळीराम गिरे जनसेवक शंकर बेनके आदींची समायोजित भाषणे झाली

