शेतकरी जागृती मंडळात फूट पडल्यामुळे देवठाण सोसायटीची चेअरमन निवड कोरम अभावी तहकूब

देवठाण प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील देवठाण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ची चेअरमन निवड आज होणार होती परंतु चेअरमन निवड च्या सभेसाठी तेरा पैकी फक्त पाच संचालक उपस्थित राहिल्याने व आठ संचालक गैरहजर राहिल्याने कोरम अभावी निवड प्रक्रिया थांबवण्यात आल्याची माहिती अकोले सहकार विभागाचे सहाय्यक. निबंधक अमोल वाघमारे यांनी दिली

मावळते चेअरमन जालिंदर बोडके यांनी राजीनामा दिल्यामुळे चेअरमन पदाची निवड आज होणार होती त्यासाठी सहाय्यक निबंधक कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या शिवसेना उबाठा गटाचे राम सहाने यांचे चेअरमन पदासाठी सत्ताधारी शेतकरी जागृती मंडळाकडून नाव निश्चित करण्यात आले होते परंतु निवड प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच सत्ताधारी गटात फूट पडली व सुभाष विठ्ठल दराडे व राम बन्सी सहाने यांनी चेअरमन पदासाठी आग्रह धरल्याने एकमत होऊ शकले नाही त्यामुळे सुभाष विठ्ठल दराडे व महेश मोहनबाबा शेळके या दोन सदस्य सत्ताधारी सदस्यांनी बैठकीत सहभाग घेतला नाही त्यामुळे फक्त पाच सदस्य मीटिंगसाठी हजर झाले व आठ सदस्य गैरहजर राहिले गैरहजर आठ सदस्यांमध्ये विरोधी जनसेवा मंडळाचे सहा सदस्य गैरहजर होते असे एकंदर आठ सदस्य गैरहजर राहिल्याने कोरम अभावी सभा तहकूब करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक अमोल वाघमारे यांनी जाहीर केले

बहुमत असताना सुद्धा सत्ताधारी शेतकरी जागृती विकास मंडळाला आपला चेअरमन निवडून आणता आला नाही

तसेच जनसेवा ग्रामविकास मंडळाला सत्ताधारी गटात पडलेल्या फुटीचा फायदा घेता आला नाही त्यांनी चेअरमन पदासाठी अर्ज भरला असता तर अगदी सहजपणे विरोधी गटाचा चेअरमन विजयी झाला असता अशी परिस्थिती आज निवडीच्या ठिकाणी होती परंतु वेळ निघून गेली
सत्ताधारी गटातील अनेक वरिष्ठ नेते मंडळांनी या निवडीमध्ये सहभाग घेतला नाही त्यामुळे सत्ताधारी संचालकांची चांगली धांदल उडाली
सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सोसायटीचे सेक्रेटरी शांताराम जोर्वेकर यांनी काम पाहिले

संपादक शिवाजी पाटोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *