देवठाण प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील देवठाण ग्रामपंचायतीची ग्रामसभा 11 ऑक्टोबर 2024 रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते या ग्रामसभेला ग्रामस्थ उपस्थित राहिले नाहीत बराच वेळ थांबल्यानंतर कोरम पूर्ण झाल्याचे समजते पूर्ण झाल्यानंतर सभा संपन्न झाली

शासन योजनांचे लाभार्थी निवडायचे असल्याने सभा रद्द करणे योग्य वाटणार नव्हते म्हणून ग्रामसेवकांनी सभा करून घेण्याचे ठरवले परंतु या ग्रामसभेला खुद्द सरपंचच गैरहजर राहिल्यामुळे ग्रामस्थांनी फार उत्साह दाखवला नाही महत्त्वाच्या व शासकीय विषयावर चर्चा झाली ग्रामसभेचे विषयी पत्रिका यापूर्वी ग्रामस्थांना देण्यात आली होती आणि व्हाट्सअप ग्रुप वरही टाकण्यात आली होती तरीही ग्रामस्थांनी पाठ फिरवली

अनेक विषय आहेत ऐनवेळी येणाऱ्या विषयात चर्चिले गेले आहेत सभा संपन्न झाली असली तरी इतक्या महत्त्वाच्या सभेला ग्रामस्थांनी गैरहजर राहणार चांगली गोष्ट नाही

संपादक शिवाजी पाटोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *