
देवठाण प्रतिनिधी
अकोले बाल विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने आरंभ उपक्रमांतर्गत राष्ट्रीय पोषण महा निमित्ताने केळी रुमणवाडी येथे बालक पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला परिसरातून उत्तम प्रकारे पृथ्वीचा मिळाला अशी माहिती या गटाच्या अंगणवाडी पर्यावेक्षिका श्रीमती ज्योती कोकाटे यांनी दिली
श्रीमती ज्योती कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व आरंभ च्या सोनाली कुळधरण , अर्चना एखंडे , सुरेखा मुंतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस सविता मेंगळ ,उषा शेलार, आशा आगविले,चंद्रभागा गोडे,रंजना चौधरी, सारिका काळे,गंगुबाई तळपाडे शोभा व्यवहारे, सीता अस्वले आदींनी परिश्रम घेतले
सांगवी, पाचपट्टा, तिरढे, म्हाळुंगी, पेढेवाडी येथील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित राहून विविध स्टॉल लावण्यात आले होते
यामध्ये जादूची गुहा, भविष्याचे झाड, रेखाटन, पाण्यातील खेळ, लसीकरण, मेंदूचे जाळे, पोषणाची सापशिडी, आहारातील घनता, मला खा, मला खाऊ नका, सुरक्षित अन्न, असुरक्षित अन्न, आरसा, खेलघर,पोषण पाककृती प्रदर्शन, उर्जावर्धक – संरक्षणात्मक – शरिरवर्धक यांसारख्या विविध स्टॉल ची मांडणी लोकसहभाग व घरगुती साहित्यातून करण्यात आली होती . आरंभ चा उद्देश 0 ते 3 पालकांना बालकांसाठी विविध कृती मार्गदर्शन करणे हा होता तसेच यात 1 ते 3 बालकांसाठी विविध खेळ, गरोदर , स्तनदा माताना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन केळी रुम्हणवाडीचे सरपंच मुरलीधर मेंगाळ यांनी केले,व तसेच प्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकारी मिना चव्हाण यांनी मार्गदर्शन केले,
या कार्यक्रमासाठी उपसरपंच सांगवी मदन डगळे, भैरव कोंदे, डॉ नयना मोरे , केळी रुम्हणवाडीचे पोलीस पाटील जनार्दन बिन्नर,ग्रा.प.सदस्य मावजी मेंगाळ , ग्रामसेविका श्रीमती गायकवाड तसेच पर्यवेक्षिका अंजना साळवे, इंदिरा सोनवणे , वंदना बांबळे , सोनाली भनगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
