देवठाण प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील देवठाण येथील श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट परिसरात प्रादेशिक पर्यटन संचालनालय मार्फत देवस्थान परिसराचा विकास करण्यासाठी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या प्रयत्नाने व पुढाकाराने दोन कोटी रुपये मंजूर झाले आहेत सदर कामाचे टेंडर पूर्ण होऊन वर्क ऑर्डर सुद्धा मिळाली आहे येत्या सोमवारी सकाळी दहा वाजता देवठाण दोडकनदी रस्त्यावरील खंडोबा मंदिर येथे आमदार साहेबांच्या शुभहस्ते भूमिपूजन संपन्न होणार आहे

या कार्यक्रमास साठी खंडोबा देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने परिसरातील ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे सोमवारी सकाळी दहा वाजता कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमाला अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सिताराम पाटील गायकर जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम चे सभापती कैलासराव वाकचौरे व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जालिंदर वाकचौरे व अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अशोक बाबा शेळके व देवठाण गावचे सरपंच व देवस्थानचे विश्वस्त निवृत्ती जोरवर अमृतसागर दूध संघाचे माजी संचालक शिवाजी पाटोळे व कामगार पोलीस पाटील राधाकृष्ण जोरवर अकोले पंचायत समितीचे माजी सभापती सुहास सेठ कर्डिले अकोले देखरेख संघाचे माजी सभापती मोहन बाबा शेळके देवठाण सोसायटीचे चेअरमन जालिंदर बोडके आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे असे देवस्थान त्याच्या वतीने सांगण्यात आले आहे

संपादक शिवाजी पाटोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *